रिक्षा, बस,टेम्पो व आग-गाडी ह्यातून प्रवास न केलेला
माणूस प्राणी सापडणे म्हणजे डोंबिवलीत
खड्डा नसलेला रस्ता सापडणे एव्हढेच दुर्मिळ…
संघटीत लुटमार म्हणजे नक्की काय?
असे जर कुणी विचारले तर रिक्षावाल्यांचा
प्रथम क्रमांक नक्की…
पूर्वी टांगा किंवा सायकल रिक्षा होत्या
पण त्यांची संघटना होती असे कधी वाचनात आले नाही…
एक तर ही दोन्ही वाहने चालवायला शारीरिक कष्ट लागतात
त्यामुळे इतर लोक पण कष्ट करून पैसे कमावतात ह्याची जाणीव असेल असे वाटते.
कष्टाळू मनुष्य आपोआपच पापभिरू होत जातो ही सत्य गोष्ट आहे.
एक वचन आहे, “एक माणूस जर ४ लोकांना नावे ठेवत असेल
तर कदाचित ती ४ माणसे वाईट असू शकतील पण जर तीच ४ माणसे
जर ह्या एकाच माणसाला नावे ठेवत असतील तर तो माणूसच खराब आहे.”
आज सगळ्या शहरांतील माणसे, काश्मीर ते कन्या-कुमारी पर्यंत ह्या रिक्षावाल्यांनाच शिव्या का घालतात?
माझ्या आजीची एक शिकवण होती, कधीही कुणाला दुखवू नकोस कारण त्याचे शाप लागतात.
कदाचित आमच्या पुण्याईने तुला त्रास नाही होणार पण तू पुण्य न केल्याने
तुझ्या मुलांना ह्याची फळे भोगावी लागतील.
बहुतेक रिक्षावाल्यांना अशी शिकवण देणारे नातेवाईक भेटत नसतील.समाज चांगला आहे की वाईट हे त्याच्या सरासरीवरून ठरते.८० ते ९०% व्यक्ती चांगल्या असतील तर तो समाज चांगला आहे असे समजल्या जाते आणि इथे तर ह्या रिक्षावाल्यांमध्ये हे प्रमाण ५% पण नाही आहे.
मी बरीच वर्षे ह्या ना निमित्ताने रिक्षामध्ये बसलो आहे आणि मला त्यांचे ९०% भयानक अनुभव आले आहेत.
फार क्वचित एखादा रिक्षावाला चांगला भेटतो.
डोंबिवलीत तर फार त्रास आहे ह्यांचा.
१. इलेकट्रोनिक मीटर न बसवणे..
२. लवकर उतरा अशी घाई करणे.
३. जवळचे भाडे न स्वीकारणे.
४. म्हाताऱ्या, अपंग व स्त्रिया ह्यांचे भाडे नाकारणे.
५. स्पीड ब्रेकर वरून उड्या मारत जायचा प्रयत्न करणे.
६. मुदाम हूल देणे.
हे तर आहेच शिवाय मराठीत न बोलता हिंदीत बोलणे हा महाराष्ट्राचा शाप पण बोलून दाखवतात.इतर कुठल्याही राज्यात स्वत:हून हिंदी बोलणारा रिक्षावाला मिळाला नाही.
असो मला आता इतरही कामे आहेत.उगाच ह्यांना शिव्या देवून आपण आपला वेळ आणि श्रम कशाला वाया घालवा.