भाऊ साहेब

काल भाऊ साहेब गेले..

अजून पण विश्वास बसत नाही…

हा देव पण ना नको त्या माणसांना खाली ठेवतो

 आणि देवासारख्या माणसांना वर बोलावून घेतो..

खरे तर भावूंची आणि माझी गाठ अचानकच पडली..

योगा-योग हा प्रकार असतोच असतो….

माझ्या नवर्याने मला घराबाहेर काढले कारण काय तर

 त्यालां दारूला पैसे न देता मी मुलाला ताप आला म्हणून दावाखान्यात नेले.मी पण न रडता घर सोडले आणि काय करावे ते न कळून सरळ डोंबिवली स्टेशनवर आले….आणि आता कुठे जायचे ते न कळल्याने तशीच बसून राहिले..नकळत रडायला कधी सुरुवात झाली ते पण कळाले नाही.थोड्यावेळाने गर्दी पण जमा झाली..त्याच गर्दीत भाऊ पण होते…त्यांनी विचारले काय झाले…मी पण सर्व कहाणी सांगितली…ठीक आहे म्हणाले…आणि मला घेवून माझ्या घरी आले…नवरा परत ओरडायला लागला तशी भाऊंनी एक जोरदार थप्पड दिली आणि म्हणाले काय बाप आहेस का कसाई….ही माझी बहिण इथेच राहणार आणि आज पासून पुढे हिच्या अंगाला जर हात  लावलास तर  तुझे काही खरे नाही….भाऊंचा तो त्वेष बघूनच नवरा गळपटला…जवळच्या चार-दोन मंडळींना गोळा करून भाऊ म्हणाले हि माझी बहिण आहे,उद्या जर हिचे काही बरे वाईट झाले तर मी तुम्हाला पण कोर्टात खेचीन…भाऊवकील म्हणतात मला….

त्यांनी त्यांचा पत्ता मला देवून ठेवला…४/५ दिवस झाले नवरा गप-गुमान रहात होता, म्हणून मी एक दिवस मुलाला 

आणि खावू म्हणून एक बिस्कीटचा पुडा घेवून भावूंकडे गेले..संध्या-काळची वेळ होती त्यामुळे भावूंकडे बरीच गर्दी होती..त्या गर्दीतही भावूंनी मला ओळखले आणि बसायला सांगितले..थोड्यावेळाने त्यांची बायको आली आणि मला घेवून स्वैपाक-घरात गेली..जातांना माझी ओटी पण भरली आणि मुलाच्या हातात ५ रु. पण ठेवले…मला पण काकुंचा सहवास आवडला आणि सणावाराच्या निमित्ताने माझे त्यांच्याकडे येणे-जाणे वाढले..

एक दिवस सहज बोलता-बोलता काकू म्हणाल्या माझ्या-कडे काम करशील का?मी लगेच तयार झाले.रोज १० वाजेपर्यंत माझी इतर कामे झाली कि मी त्यांच्याकडे जात होती.दुपारी ३ वाजे पर्यंत तिथेच राहून मग ३ ते ६ इतर कामे करून परत भावूंकडे जात होती.माझा मुलगा सतत माझ्याबरोबर असायचा.एक दिवस मग काकू म्हणाल्या अग कशाला त्या मुलाला घेवून हिंडत बसतेस.तू १० वाजता आलीस की मुलाला इथेच ठेव.आणि मग संध्या-काळी मुलाला घेवून जा.मुलगा १०वी होई-पर्यंत हाच दिन-क्रम होता..

मी त्यांच्याकडे कामाला लागली आणि त्याच सुमारास नवर्याचे दारूचे व्यसन पण कमी होत गेले.चांगल्या घराचा पाय-गुण.भावूंनी मग एक दिवस मला सहज म्हणून विचारले कि नवरा अजून दारू पितो का आणि मला त्रास देतो का? मी नाही म्हणून सांगितले.काही दिवसांनी मग भावूंनी प्रयत्न करून त्याला एका कंपनीत चपराशी म्हणून नौकरी मिळवून दिली.त्या घरात राहिल्या-मूळे मुलावर पण चांगले संस्कार होत होते.भावूंची मुले पण खूप शिकली आणि नौकरी-निमित्ताने शहर सोडून दुसरी-कडे गेली..मुलाचे शिक्षण पूर्ण झाले आणि मग आम्ही थोडे मोठे घर घेतले.

न मागता दर ७ तारखेला भावू पगार देत असत.भावू आणि काकू आता थोडे वयस्कर पण झाले होते.सतत पाण्यात काम करून मला पण त्रास व्हायला लागला..माझी पण गात्रे थकत चालली होती.शेवटी एक दिवस मी धाडस करून काकूंना सांगितले कि आता माझ्या-कडून कामे होत नाहीत.इतर कामे तर मी केंव्हाच बंद केली आहेत फक्त तुमचेच काम मी करत होते, पण आता प्रकृतीमुळे ते पण शक्य होईल असे वाटत नाही.माझ्या माहितीत एक बाई आहे,तिला कामाची खूप गरज आहे आणि विश्वासू पण आहे.ती येईल चालेल का?..काकू हो म्हणाल्या आणि ती बाई त्यांच्याकडे जावू लागली.तरी पण दर ७ तारखेला काकू स्वत: येवून अर्धा पगार देत होत्या.मी घ्यायला तयार न्हवते अहो आपण देवाला द्यायचे कि त्याच्याकडून घ्यायचे?..तरी-पण त्यांचे मन मोडू नये म्हणून घेत होते आणि एका अनाथाश्रमात दान करत होते..

आणि आज सकाळी बातमी आली की भावू गेले.नवरा आणि मी लगेच गेलो.कार्य आटोपले आणि घरी आलो.त्या रात्री माझा नवरा म्हणाला कि त्याचा खरा मित्र पण आज गेला कारण त्याची दारू सुटावी म्हणून भावूंनीच त्याला खूप मदत केली.मुलाच्या शिक्षणाला पैसे कमी पडले तेंव्हा आणि घर विकत घ्यायला पण भावूंनी मदत केली होती.

“लाख मरो पण लाखांचा पोशिंदा न मरो” असे का म्हणतात ते त्या दिवशी अनुभवले.पण मला असा अनुभव नको होता…..

Advertisements

यावर आपले मत नोंदवा

Filed under Uncategorized

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s