कुटुंब

कुटुंब म्हणजे तरी वेगळे काय असते…

रेशमी धाग्यांनी गुंफलेले  एक सुबक घरटे असते….

तिचे घर-काम तर ह्याची बाजारहाट असते…

तो आजारी पडला तर तिच्या डोळ्यात पाणी असते..

 

एक एक काडी गोळा करून आपलेच घर बांधायाचे असते…

एक-मेकांच्या कलाने ते हसत-खेळत सावरायचे असते…

एक चुकला तर दुसऱ्याने समजून घ्यायचे असते..

नकळत मिठीत शिरायचे असते…

 

कुणी आजारी पडला तर औषध द्यायचे असते…

न विसरता वैद्यांकडे न्यायचे असते…

घरातील भांडणे घरातच ठेवणे योग्य असते… 

पेल्यातल्या वादळाला पेल्यातच ठेवायचे असते….

 

राग आला तर तो पोटात टाकणेच बरोबर असते….

ओठानीच गप्प करणे हेच त्यावर औषध असते….

Advertisements

यावर आपले मत नोंदवा

Filed under Uncategorized

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s