…आजी व आजोबा….

आज ते दोघेही शरीराने आमच्यात नाहीत…

राहिल्या आहेत त्या फक्त गोड आणि अविस्मरणीय आठवणी…

आज्जी व आजोबा म्हंटले की मला फक्त माझ्या

आईचेच,  आई व वडील आठवतात…

वडीलांचे   आठवत नाहीत कारण तेव्हढा सहवास न मिळाल्याने..

 

आजोबा आणि आज्जीचा संसार म्हणजे फक्त कष्ट आणि गरिबी…

पण त्या गरिबीत देखील त्यांनी  कधी कोणाकडून एक पैसा उधार घेतला नाही

आणि घरी आलेल्या माणसाला कधी उपाशी पाठवले नाही…

लग्न झाले तेंव्हा माझे आजोबा हे एकटेच कमावते पुरुष होते..

आजोबांचे वडील त्यांचे म्याट्रिक पूर्ण व्हायच्या आधीच देवाघरी गेले होते..

आणि इतर सर्व भावंडे लहान होती आणि त्यांची शिक्षणे पण पूर्ण व्हायची होती..

लग्नाच्या वेळीस ह्याची पूर्ण कल्पना आजीला होती आणि तिने पण ह्याला संमती दिली होती….

 

आजोबा सरकारी नौकरीत जनावरांचे डॉक्टर असल्याने सतत फिरतीवर असत..शिवाय त्याकाळी पगार पण खूप कमी होते त्यात भावांच्या शिक्षणासाठी पैसे द्यावे लागत..ह्या जोशी मंडळींचे पण एकमेकांवर एव्हढे प्रेम आणि विश्वास की एक एक भावू जसा शिकत गेला तसा दुसऱ्याला मदत करत गेला…आजोबा आपले कमी असलेले शिक्षण वाचून पूर्ण करीत..एक उदाहरण देतो..माझी मावस बहिण एम.एस्सी. करत असतांना तिला काही शंका उपस्थित झाल्या…त्या शंकांचे निरसन करण्यासाठी ह्या सत्तरीतील विद्यार्थाने स्वत: ती पुस्तके वाचून आणि विषय समजून घेवून तिच्या शंकांचे निरसन केले..

कधीही कुणाविषयी द्वेष नाही, मत्सर नाही, टोमणे नाहीत की फाजील गप्पा नाहीत…त्यांच्या बरोबर गप्पा म्हणजे ज्ञानात नक्की भर आणि ती देखील हसत-खेळत….आजोबा हे अव्यवहारी…तर आजी मात्र एकदम व्यवहारी…आजोबांच नाही तर सगळेच जोशी देवाची माणसे…राग हा प्रकार काय असतो हेच माहीत नसणारी…माझ्या दुर्दैवाने माझा आणि आजोळचा संबंध वर्षातून फक्त दोन वेळाच यायचा पण तो देखील लक्षात राहील असा…शिवण आणि वाचन हे गुण माझ्या आज्जीकडे होतेच पण नंतर ते गुण तिने तिच्या मुलींना पण दिले…आजोबा निवृती-वेतन जास्त मिळत नसल्याने छत्री पण शिवत असत…माझ्या वडिलांचे आणि आजोबांचे एकाच बाबतीत एकमत होते आणि ते म्हणजे कंजूष पणाकडे झुकणारा काटकसरी पणा…

एकाच शर्ट आणि एकाच प्यांट फक्त प्रवासापुरातीच  जवळ जवळ १५-१६ वर्ष वापरीत होते…आणि घरी झब्बा व लेंगा….एक ठराविक वेळ प्रत्येक कामाला असायची..कधी डोंबिवलीला ७/८ दिवसांसाठी आले की दुसऱ्या दिवसा पासून त्यांचे वेळा-पत्रका नुसार दिन क्रम सुरु व्हायचा…जेवण कसेही असू दे पण कधीही जेवणाला नावे ठेवत नसत… गोडे वरण मात्र त्यांना रोज लागत असे आणि ही पण खूप डोई-जड मागणी नसल्याने ती प्रत्येक घरी पूर्ण केली जात असे…

माझ्या मावस बहिणी खूप भाग्यवान कारण त्यांना ह्या दोन अतिशय पुण्यवान माणसांचा सहवास दीर्घ-काळ मिळाला…आज त्यांच्या मोठेपणात, (एक गायन क्षेत्रात,दुसरी शिक्षण क्षेत्रात तर तिसरी कला क्षेत्रात….नाव राखून आहेत), ह्या दोन्ही देव-दुतांचा खूप मोठा हात-भार आहे…ह्या तिघींचे हे वेगळे वेगळे गुण ओळखून त्यांना तसे शिक्षण देण्यासाठी निवृती नंतर प्रयत्न करणारे आजोबा आणि आज्जी मला मात्र फार कमी वेळ मिळाले…आजोबा हे एक उत्तम बासरी वादक, शिक्षक,जलतरण पटू, हॉकी खेळाडू तर होतेच पण शिवाय एक उत्तम क्यारम आणि ब्रिज पटू पण होते….क्यारम आणि ब्रिज तर त्यांनी आज्जीला, मावशीला आणि नंतर मला पण शिकवले….आज जर कुणी मला मी हे दोन्ही खेळ चांगले खेळतो असे म्हटले तर तो त्यांचा बहु-मान आहे….

आजोबांच्या अव्यवहारी पणाला थोडा तरी बांध असावा म्हणून देवाने आज्जीला त्यांची अर्धांगी म्हणून पाठवले होते….मुलांच्या लग्नाचा सर्व आर्थिक भार आज्जीनेच सांभाळला…आणि तसेच इतर कार्यात पण…निवृती नन्तर आजी व आजोबा एक मस्त आयुष्य जगले….रोज सकाळी आजोबा वाचनालयात जात व सर्व वर्तमान पत्रे वाचून काढत…मग तिथून ते मावशीच्या घरी जात…तिच्या मुलींना अभ्यासात काही मदत हवी असेल तर करत…आणि मग दुपारी जेवायला घरी येत…जेवण झाले की दुपारी १ ते सव्वा तास वाम-कुक्षी आणि मग चहा पिवून आज्जी बरोबर मोजून ५ डाव रमी….ह्यात पण बऱ्याच वेळा आजीच जिंकत असे…एक दिवस न राहवून आज्जी म्हणाली की… तुमच्या मागे आरसा आहे,त्यात मला तुमची सगळी पाने दिसतात…मग मी तुम्हाला हवी ती पाने टाकत नाही….आजोबा म्हणाले….अग तुला जिंकण्याचा आनंद मिळावा म्हणून मीच तो तसा ठेवला आहे….मी कधी तुला ५ ग्रॅम सोने नाही घेवून दिले पण रोज हे ५ डाव तरी तुला देवू शकतो….

असे हे आज्जी व आजोबा , देवाघरी जाण्या पूर्वी आमच्या पुढे एक आदर्श ठेवून गेले….

खरं सांगा सुख म्हणजे नक्की काय असते…

जोडीदाराच्या प्रगतीतच  आपले सुख असते…

Advertisements

यावर आपले मत नोंदवा

Filed under Uncategorized

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s