जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने…..

जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने…..
 
सर्व स्त्रियांना शुभेच्छा….
 
मला मार्गदर्शन देणाऱ्या काही स्त्रिया…रामायण काळातील…
 
१. वाल्या कोळ्याची बायको……
तुमच्या पापात मी सहभागी नाही ते स्पष्ट पणे सांगणारी
 आणि नवऱ्याच्या पापात सहभागी न होणारी….
हल्ली बऱ्याच बायका नवऱ्यान्च्या   पापात सहभागी होतात असे वाटते…..
आणि…
वाल्या कोळ्याची बायको जर असे म्हणाली नसती तर
 वाल्या कोळ्याचे वाल्मिकी ऋषीत रुपांतर झाले असते का?
च्यामारी उद्या आपली पण बायको अशीच म्हणाली तर?….
त्यापेक्षा पाप न केलेलेच बरे…..एक तर पाप करा….नंतर तप करा…
आणि नंतर परत काव्य लिहा….
आधीच इथे कामाचे अहवाल लिहितांना मारामार तिथे काव्य कोण लिहित बसणार?……
 
२. सीता….मस्त वनवास सुरु असतो….
१३ वर्षे पूर्ण होवून १च वर्ष राहिलेले असते…
आता पुढील वर्षी राज्य करायला मोकळी…
असे असतांना  हिला सोन्याचा  हरीण दिसतो…
मग ही मागणी करते की मला त्याचे कातडे हवे….
का तर चोळी शिवायला….आता बघा….हे सगळे एक तर वनवासात….
शबरी शिवाय कोणी इतर स्त्री नाही….
त्या शबरीला  रामाचे दर्शन झाले ह्याचेच समाधान….
ती कशाला सीतेच्या वस्त्रांकडे बघेल?…तरी पण सीतेने हट्ट का करावा?…
आणि रामाची पण कमाल आहे…सोन्याचे हरीण कधी असते का?….
तरी पण स्त्री हट्टापुढे नमून बिचारा गेला तीर-कमठा घेवून….
 
जसे आपण उधार-पत्र घेवून सोनाराकडे जातोना तसेच……
मला तरी प्रत्येक सोनार हा रावणच वाटतो…
सोने विकतांना एक भाव आणि विकत घेतांना दुसरा भाव…
परत ह्यांच्या कडे तापमान-नियंत्रक यंत्र…काचेची कपाटे….मऊ गाद्या…हे काय ते त्यांच्या पैशाने घेतात काय?…
आपल्याच पैशाने न?….” गॉडफादर” ह्या पुस्तकात एक वाक्य आहे…..की एक वकील हातात फक्त ब्रीफ-केस घेवून लूट-मार करू शकतो…मला वाटते की त्यापेक्षा पण जास्त लूट-मार….   एक सोनार, सोन्याचे दुकान टाकून करतो…..
 
त्यामुळे मी तरी माझ्या बायकोसाठी जवळ-जवळ रोज एका ठराविक गजरेवालीकडून गजरा विकत घेतो…अहो गजऱ्यात समाधान मानणारी बायकोच तिच्या घरावर सोन्याची कौले चढवू शकते…
 
३. सुमित्रा…ही तशी अभागी स्त्री….रामाची आई म्हणून कौसल्या आणि भरताची आई म्हणून कैकेई पटकन लक्षात राहते पण जिच्या दोन्ही मुलांनी रामासाठी  त्याग केला ती मात्र एका ठराविक काळानंतर पटकन आठवत नाही…..जिथे सख्खे भावू एक-मेकांना विचारत नाहीत तिथे सावत्र भावाला मदत करायला परवानगी देणाऱ्या ह्या मातेचे खरेच कौतुक…..
 
४. मंथरा….ज्याची करावी चाकरी त्याचीच वाजवावी टाळी…हे ब्रीद वाक्य प्रत्यक्षात आणणारी……आपल्या मालकिणीचे   भले व्हावे म्हणून तिला योग्य तो कान मंत्र देणारी….तिला बहुतेक “श्रावण बाळाच्या , आई व वडिलांनी दिलेला शाप माहित नसावा”…..नाही तर एव्हढे  मस्त राज-कारण करणाऱ्या बाईने कैकेईला असा उत्तम सल्ला दिला नसता….माझा रामायणाचा अभ्यास अजून सुरु झाला नाही आहे….जाणकारांनी प्रकाश टाकावा….
 
५. उर्मिला….हिची तर गोष्टच वेगळी….आणि म्हणूनच जास्त लक्षात राहणारी……..
 
रामाबरोबर आहे  सीता….
भरता बरोबर आहे मांडवी….
शत्रुघ्नसंगे आहे श्रुतकीर्ति….
उर्मिला मात्र एकटी…
 
हिची बिचारीची खरी तर काहीच चूक नाही….वनवासाला जाणार कोण तर राम…ठीक आहे…त्याची बायको म्हणून सीता…त्याला मदत म्हणून लक्ष्मण…ठीक आहे…पण मग उर्मिला का नको?….तर लक्ष्मणाला ब्रह्मचर्याचे पालन करता यावे म्हणून….पण त्या साठी ह्या व्यक्तीवर आपण अन्याय करत आहोत ही जाण नसावी?…हे मनाला पटत नाही…रामायणात “नवरा-बायको” ह्यांचे संबंध कसे असावेत ह्याची उत्तमोत्तम उदाहरणे आहेत….(मंदोदरी आणि रावण…इंद्रजीत आणि सुलोचना…इ.)मग त्याच काळात हेच एक-मेव उदाहरण का?….
 
निदान मला तरी एकच योग्य वाटते…..भावा-भावाच्या संबंधात आपण पडायचे नाही…..कदाचित आपल्याला त्रास होईल….पण…रावणाला मारण्यासाठी आपल्याला हा त्याग केला पाहिजे…हा असाच संदेश ती देत असावी…..
Advertisements

यावर आपले मत नोंदवा

Filed under Uncategorized

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s