शाळा आणि विषय….संगीत….

माझा आवडता विषय….
कारण एकच….
गाण्याच्या नावाखाली घसा साफ करता येत होता….
 
खरे तर माणूस संगीत ऐकतच जन्माला येतो…
संगीत न आवडणारा मनुष्य नक्कीच बहिरा आहे असे समजून चालावे…
अहो संगीतापाई वेडी झालेली अनेक माणसे आहेत..
आणि काही वेडे पण संगीत ऐकले की सामान्य माणसासारखे
हाव-भाव करणारे,आनंदित होणारे मी बघितले आहेत….
पण असा आनंद लहानपणीच कसा काढता येईल आणि असे आनंद-दाई
आवडते  विषय पण कसा नावडते  करता येतील
ह्याची शिक्षण खात्याने पुरेपूर काळजी घेतली होती….
 
गाणी ताला सुरात कशी म्हणता येतील हे शिकवण्या-पेक्षा…..
झपताल, त्रिताल वगैरेच शिकवत बसतात…
आता वयाच्या ४६व्या वर्षी पणगेली २० वर्षे
बायको कुठल्या तालात झापते आणि धपाटे घालते ते सांगता येत नाही..
तर वयाच्या १०व्या वर्षी हे झपताल आणि त्रिताल कसे काय लक्षात राहतील….
 
सुरात गाणे कसे म्हणावे हे शिकवण्यापेक्षा…..
कुठला राग कघी गावा हे शिकण्यात त्या वयात काहीच रस नसतो…
राग भीम-पलासी आणि राग भूपेश्वरी ह्यातील वादी आणि संवादी सांगा ह्यापेक्षा
त्या त्या रागातील गाणी म्हणून दाखवा असे शिकवण्यात जास्त मझा आली असती……
 
वाद्ये जर हाताळायला दिली असती तर जास्त अनुभव मिळाले असते…
तबला आणि मृदुंग….
ऑर्गन आणि पियानो….
तानपुरा आणि सतार ह्यातील फरक त्यांचा नादच सांगतो….
 
तबला किंवा तानपुरा उतरला हे वाक्यात नाही सांगता येत ते वाजवूनच जमते….
ठक-ठक असा आवाज आला की तबला उतरला हे ऐकणे वेगळे आणि स्वत: अनुभवणे वेगळे…
संवादिनीचा “सा” कसा लावायचा हे वाचून नाही तर स्वत: त्या पट्ट्यानशी खेळूनच शिकावे लागते….
 
तबला, संवादिनी आणी तानपुरा साथीला असले तरी उत्तम गाणारा स्वर्ग गाण्याच्या रुपेने भू-तलावर आणतो हे अनुभवायला लागते आणि हे असे अनुभव मला शाळेत नाही तर डोंबिवलीत “गणेश मंदिरात” मिळाले….एखाद्या उत्तम वादकाला शाळेने कधी आणले नाही किंवा आम्हाला वाद्यांना हाताळू दिले नाही…अर्थात त्यांची तरी काय चूक…ते बिचारे पशु सर्वेक्षण आणि जन सर्वेक्षण एकाच पेनाने लिहिणार…झापड लावलेला बैल कसा शेतीला  उपयोगी  न ठरता  तेलच काढायला  उपयोगी ठरतो तसेच  शिकक्षकांचे रुपांतर पगारी नौकरात झाले की तो पण मुलांच्या डोक्यात काय शिरत आहे हे न बघता किती डोकी आली आहेत हेच मोजणार ना?
 
भारत-रत्न पंडित भीमसेन जोशी संगीत शाळेत शिकले नाहीत म्हणूनच त्यांना गायला यायला लागले…..
निदान ह्या एका अनुभवावरून तरी आपले शिक्षण खाते योग्य तो बोध घेईल अशी आशा पण हे होणार नाही ह्याची खात्री पण…
कारण आपण इतिहासातून काहीच बोध घेत नाही असाच खरा इतिहास आहे…..
Advertisements

यावर आपले मत नोंदवा

Filed under Uncategorized

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s