शाळा आणि विषय….चित्रकला…..

 
माझे आणि चित्रकलेचे वावडे…
आता एखाद्या माणसाला नसेल ती कला पण म्हणून ती शिकायचा अट्टाहास का?
आम्ही ती कसर अकबर बादशाहला दाढी आणि वेणी काढून पूर्ण करत असू….
झाशीच्या राणीला मिशा न काढणारा एक तर अति अभ्यासू किंवा चम्प्या….
मी तर एके वर्षी कुतुब-मीनाऱ्यावर घड्याळ काढले होते….
 
ह्याची पण लेखी परीक्षा असते…संगीत ,शिवण, कार्यानुभव आणि P.T. सारखी……
कुठला रंग कशात मिसळला की काय होते अशी…
पिवळा आणि तांबडा रंग मिसळला की नारंगी
(म्हणजे संत्र्या सारखा पण त्याला संत्रा रंग असे न म्हणता
नारंगी असेच म्हणावे असा बहुतेक राष्ट्र पतींचा फतवा असावा….
जो जुलूम करतो तो फतवा आणि जे मोडता येते ते पत्रक…
अशीच माझी अजूनही समजूत आहे….)
काळा आणि पांढरा रंग एकमेकात मिसळला की राखाडी रंग तयार होतो….
(आता हे फक्त माणूसच करतो हं…आमच्या इथल्या काळ्या गाईला गोऱ्या बैलाकडून काळेच बाळ झाले…
मी भर वर्गात हे चित्रकलेच्या शिक्षकांना बोलून दाखवले तर मला त्यांनी ” वात्रट ” अशी  पदवी तर दिलीच शिवाय पाठीवर शिक्के पण मारले…
खरे बोललो तर असा मान-सन्मान मिळतो…कळत नकळत संस्कार…)
 
” भारताचा नकाशा काढा”   हा असाच एक अनावश्यक प्रश्न….
मी एके दिवशी ३ वेळा हा नकाशा काढायचा प्रयत्न केला..
इतिहास,भूगोल आणि चित्रकला……
आणि
प्रत्येक वेळी ते वेगळे वेगळे आले……
किती तरी पेनं मोडली, हात  दुखला… पण मला अजूनही भारताचा नकाशा काढता येत नाही……
 
 
आणि चित्रकला येत नसली तरी देवाने निर्माण केलेल्या चालत्या-बोलत्या
कला कृतींचा आस्वाद घ्यायला चित्रकला यायलाच हवी असा काही कुणी नियम तर नाही ना काढलेला…
तरी पण हा विषय शाळेत शिकवल्या जातो….
 
जीव-शास्त्र ह्या विषयातील माझा आवडता विभाग म्हणजे “अमिबा” कारण तो कसाही काढला तरी चालतो…
पण बाकी वनस्पती शास्त्रात पान आणि झाड हे आवडते….
पण फूल काढायला आणि रंगवायला कधी जमलेच नाही…
 
स्थिर चित्रकला आणि व्यक्ती चित्रण कधी जमलेच नाही…माझ्या वर्गात “पराग चिटणीस” नावाचा मुलगा होता.
त्याची चित्रकला म्हणजे एकदम अप्रतिम…अगदी राष्ट्रपती पदक वगैरे मिळवलेला…
एके वर्षी बिचार्याने मागच्या जन्मीचे पाप फेडायला म्हणून आमचा बाक-सवंगडी झाला..
आणि…
नेमके त्याच वर्षी त्याला कुठलेही बक्षीस मिळाले नाही…..
वाण नाही पण गुण लागला…..
 
माझी आवडती चित्रकला म्हणजे मुक्त चित्रण….कसेही काढा आणि रंग भरा….
अहो देव पण तेच करतो ना…..
६०० कोटी माणसे ह्या जगात आहेत पण   एक जण  दूसऱ्या सारखा असेल तर शप्पथ..परत सगळ्यांचे रंग वेगळे….
 
 
नंतर अभियांत्रिकी कोलेज मध्ये चित्रकला आवडली ती दोन कारणांनी…
१. म्हणजे T-Square….
आणि
२. शिक्षक…..ते सर एव्हढे मस्त शिकवायचे की लगेच लक्षात राहायचे…..
 
चित्रकलेचे शिक्षक पण एव्हढे पार्शालिटी करायचे की काही विचारू नका…सर्व सुंदर मुलींना व हुशार मुलांना सढळ हस्ते
गुण द्यायचे.आयला त्या गोखल्याची व माझी चित्रकला सारखीच पण त्याला मात्र ८० व मला फक्त ५२….

एकदा हळूच मी माझ्या आणि गोखल्याच्या वहीची अदला-बदल केली… आणि त्याला ५३ व मला ८१ गुण बघून खात्रीच पटली….

ह्याने एक गोष्ट मात्र सिद्ध केली….
 
काम कसे झाले आहे ह्याचे मूल्य-मापन…कामावर अवलंबून नसून….
ते काम कोणी केले आहे ह्यावर पण अवलंबून असते….
Advertisements

यावर आपले मत नोंदवा

Filed under Uncategorized

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s