शाळा आणि विषय….इतिहास……

 
खरे तर शाळा ही अत्यंत आवश्यक गोष्ट आहे …
पण तिला मनोरंजक न करता कंटाळवाणी कशी करता येईल..
ह्याचाच विचार जास्त केला जातो.
 
मला शाळेत “इतिहास” हा विषय ४थी नन्तर
कधीच आवडला न्हवता..
४थीत जास्त आवडला…कारण एकच…
छत्रपती शिवाजी महाराज….
 
केवळ हे व्यक्तिमत्व आवडले म्हणून
“श्रीमान योगी”चे दोन्ही भाग त्या सुट्टीत वाचून काढले…
 
 
पण ५वीत २ गोष्टी घडल्या…
१. शाळा बदल
२. मोहेन-जे-दारो…
 
गड आणि किल्ले महाराष्ट्रातील असल्याने काही-तरी लक्षात रहात होते…
पण जो भू-भाग मी कधीच बघू शकणार नाही त्याची त्या अजाण वयात
 माहिती करून द्यायची काही आवश्यकता न्हवती..
आणि त्यानंतर आर्य व अनार्य….हे पण अनावश्यकच वाटले..
 
देवगिरीचा इतिहास शिकवला पण शंकरदेव रायाचे केलेले हाल नाही शिकवले….
कर्णावतीचे नामकरण अहमदाबाद म्हणून केलेले शिकवले..
पण…..
अहमदशहाने तिथल्या प्रजेचे काय हाल केले ते नाही शिकवले…..
 
हा असा अर्धवट इतिहास शिकवून काय फायदा….सन आणि सनावळी पेक्षा…माणसे आणि कर्तुत्व…
मोठी माणसे आणि त्यांचा अहंकार हा असा इतिहास का नाही शिकवला जात?
आपण अमेरिका व युरोपचा इतिहास शिकतो…पण आपल्या राष्ट्रातील इतर राज्यांचा इतिहास का नाही शिकवल्या जात?
 
माझे तर असे ठाम मत आहे की…..
इतिहास हा शिकवण्यापेक्षा “वाचायला” द्यावा आणि ४/५ मुलांचा एक गट तयार करून त्यांनाच तो धडा इतर मुलांना शिकवायला सांगावा…
जरूर तिथे शिक्षकांनी मदत करावी…..
 
ज्याचा इतिहास पाठ असतो त्याला पूर्वी झालेल्या चुकांची पण आठवण रहाते आणि पुन्हा-पुन्हा होणार्या चुका टाळल्या जातात…
आणि
केवळ ह्याच गोष्टीमुळे कुठलीही व्यक्ती स्वत: मोठी तर होतेच पण समाजासाठी पण मदत करते….
Advertisements

यावर आपले मत नोंदवा

Filed under Uncategorized

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s