आज एक मस्त लेख वाचनात आला. “भारताची प्रगती” ह्या विषयावर.खरेच प्राचीन भारताने तंत्रज्ञान ह्या विषयात खूप मौलिक भर टाकली होती..”शून्य ह्या संकल्पनेचा शोध असो की आकाशातील ग्रह असो..आयु:विज्ञान असो की अणू-रेणू चा शोध असो..त्यावेळी भारत आणि चीन हे देश आघाडीवर होते.कारण देशातील राज्यकर्ते स्थिर होते आणि परकीय आक्रमण झाले न्हवते.आपापसात युद्धे होत असत पण कोणी मंदिरे अथवा वाचनालये ह्यांचा नाश करत न्हवते.सूर्य स्थिर आहे आणि पृथ्वी व इतर ग्रह तिच्या-भोवती फिरत आहेत असा शोध लावला म्हणून त्या भारतीय शास्त्रज्ञाला कुठल्याही राजाने देहदंड दिला नाही..ते त्यांच्या जागी आणि राजा व प्रजा आपल्या जागी..नालंदा व तक्षशिला ह्या विद्यापीठांचा आणि राज्यकर्ते ह्यांचा संबंध फक्त दान घेणे व दान देणे ह्यापुर्ताच मर्यादित होता..
पण जेंव्हा परकीय आक्रमण आले त्यावेळी त्या परकीय लोकांनी सर्वप्रथम वाचनालय आणि नंतर मंदिरे ह्यांचा नाश केला..शिक्षक आणि विद्यार्थी ह्यांचा पण नाश केला..शिक्षण घेतांना पुस्तक आणि शिक्षक आवश्यक घटक असतात.आणि त्याच वेळी भक्कम सामाजिक,आर्थिक आणि राजकीय पाठींबा लागतो.भुकेला मनुष्य आधी पोटाची खळगी भरायचा प्रयत्न करेल आणि मगच बुद्धीची तहान भागवायचा प्रयत्न करेल.पण त्यासुमारास सगळीच अनागोंदी होती ती थेट १९४७ पर्यंत चालूच होती.
इंग्रच लोकांनी एकच चांगले काम केले आणि ते म्हणजे त्यांनी त्यांची भाषा आपल्याला शिकवली.पण बाकी प्रत्येक ठिकाणी त्यांनी भारतात जुने तंत्रज्ञान दिले.स्वतंत्र झाल्यावर पण त्यांनी आपल्याला दोन शत्रू दिले.एक अंतर्गत आणि दुसरा शेजारी.मी आधीच व्यक्त केलेले मुद्दे आता थोडे विस्तारपूर्वक लिहितो…
भक्कम सामाजिक,आर्थिक आणि राजकीय पाठींबा….
सामाजिक पाठींबा…
समाजाची उन्नती ३ ठिकाणी होते….वैचारिक,आर्थिक आणि तंत्रज्ञान….आजही आपल्याला वैचारिक स्वातंत्र्य आलेले नाही…जे काही वर्तमान पत्रात आणि टी. व्ही. वर दाखवतात तेच सत्य असे समजणारी ६० ते ७० % प्रजा ह्या देशात आहे.एक उदाहरण देतो…शरद पवारांनी जशी थोबाडीत खाल्ली तशीच थोबाडीत अजून कुणी-कुणी खाल्ली असे कुठल्याही वर्तमान पत्रात आणि टी. व्ही. वर आले नाही…त्याच घटनेवेळी ह्याच जनतेची काय प्रतिक्रिया होती ते स्वत:हून जाणून घ्यायचा कुणी प्रयत्न पण केला नाही…म्हणजे आज लोकांनी काय बघावे आणि काय वाचावे आणि काय प्रतिक्रिया द्यावी हे कोणीतरी भलतेच ठरवत आहे…म्हणजेच आज तरी भारतात वैचारिक स्वातंत्र्य नाही…माझा मुलगा अथवा मुलगी संशोधन करत आहे आणि आमचा त्यांना पाठींबा आहे असे किती पालक सांगू शकतील..माझ्या क्षेत्रात आजही ९०% वस्तू भारतात तयार होत नाहीत किंवा त्यांचे संशोधन पण होत नाही…त्या फक्त असेम्बल केल्या जातात..
आर्थिक पाठींबा…
अन्न , वस्त्र आणि निवारा ह्या नेहमीच प्राथमिक गरजा असतात…आणि जोडीला वीज व दळण-वळण ह्या पण पूरक गोष्टी लागतात..मी सध्या भारतात रहात नाही आणि त्यामुळे एक गोष्ट
माझ्या लक्षात आली की माझे इथे कामात मन रमते कारण रोजच्या आयुष्यात मला माझी अनावश्यक शक्ती वाया घालवायला लागत नाही.वीज,पाणी आणि वाहतूक सुरळीत असते.मला माझ्या वेळेप्रमाणे कपडे धुणे,भांडी घासणे,स्वैपाक करणे इ. गोष्टी करता येतात.त्यामुळे माझ्या वेळेचा उपयोग मला कसा करायचा ते ठरवता येते.उगाच वीज आणि पाण्याची वाट बघण्यात वेळ वाया जात नाही..भारतीय मनुष्य पैसे कमावतो ते ३ व्यक्तींसाठी…१) शिक्षण-सम्राट..२)गृह सम्राट आणि उरलेले ३)आरोग्य सम्राट…..ह्यापैकी ३रा सर्वात घातक…कारण सध्या जरी त्यात परदेशी गुंतवणूक कमी असली तरी ती उत्तरोत्तर वाढत जाणार आहे…आणि त्यावेळी आपले स्वत:चे असे पैसेही फार कमी उरलेले असतात..आजही कुठलीही व्यक्ती आपल्या मुलांकडून आरोग्यासाठी पैसे मागत नाही..ज्या व्यक्तीने गेली २५-३० वर्षे इमाने-इतबारे कर दिला आहे तिला निदान आरोग्य-सेवा तरी फुकट असावी असे कुठल्याच नेत्याला वाटत नाही आणि तो आपला अधिकार आहे असे जनतेला पण वाटत नाही…कारण ह्या गोष्टींची चर्चा टी. व्ही. वर येत नाही…ह्याविषयी काही कायदे करावेत असे वर्तमान पत्रे पण लिहित नाहीत…
राजकीय पाठींबा….
इतर दोन्ही पाठींबे ह्याच्या शिवाय येणार नाहीत..आज कितीतरी विद्या-पीठे आणि शिक्षण संस्था सरकारी पैशांवर चालतात.गोष्ट चांगली आहे.पण मग अशा उत्तम संस्थेतील विद्यार्थी भारतीय जनतेने दिलेल्या पैशांवर शिक्षण पूर्ण करून परदेशी जातात.तिथेच स्थाईक होतात.ह्यामागे नक्की काय कारण आहे ह्याचा शोध का घेतला जात नाही आणि हीच मंडळी परत आपल्या देशात यावी म्हणून काय योजना करावी असे सरकार का ठरवत नाही?आज कुणीही दत्ताजी शिंदे किंवा फिरंगोजी न होता सूर्याजी पिसाळ ह्यांचाच आदर्श का ठेवत आहेत?चूक ते भारत सोडून गेले ही नसून भारतीय सरकार सामान्य माणसाला सुखा-सुखी जगू देत नाही हि आहे..असो घरचे जर जेवण देत नसतील तरच आपण घर सोडतो..घरी जेवण मिळाले तर कोण बाहेर जाईल?
जो पर्यंत राजकीय पाठींबा नसेल तोपर्यंत सामान्य माणूस आर्थिक विवंचनेतच गुंतून राहील आणि त्यामुळे सामाजिक स्थैर्य पण येणार नाही….अशीच स्थिती राहिली तर ज्या भारताने शून्याचा शोध लावला तोच भारत स्वत: एक मोठा शून्य व्हायला वेळ लागणार नाही
Advertisements