प्राण…यारी है इमान मेरा यार मेरी जिंदगी….

प्राण हे नाव माझ्या मनात तरी ह्याच एका गाण्या बरोबर येते.

प्राणची (इथे ह्याना अहो जाहो कशाला करायचे?) आणि माझी चित्रपट ओळख जंजीर पासून.(मी अद्याप कुठल्याही कलाकारांना प्रत्यक्ष भेटलेलो नाही आहे).चित्रपट संस्कार होण्याच्या त्याकाळात काही चित्रपट लक्षात राहिले तर काही विस्मृतीत गेले.जंजीर लक्षात राहिला तो पानवाल्यामुळे (पानवाला मारामारी बघतांना एवढा रंगून जातो की तो पानाला चुना न लावता हाताला चुना लावायला लागतो)…आणि प्राणचे गाणे व मित्रासाठी जीप घेवून येणे….

 अमिताभ, धर्मेंद्र, विनोद खन्ना, जितेंद्र, ऋषी कपूर व शत्रुघ्न सिन्हा हे त्यावेळी फुल फॉर्म मध्ये होते…आणि ह्यांच्या सिनेमात ह्या ना त्या रूपाने प्राण असायचाच…मनोज कुमारने उपकार सिनेमा काढून आमच्या सारख्या चित्रपट व्यसनी मंडळींना प्राणच्या अभिनयाचे दुसरे अंग दाखवून खरेच उपकार केले आहेत..(त्यामुळे प्रेम नाथ सारख्या तद्दन फालतू नटाला खल-नायक म्हणून वाव मिळाला…हे साइड इफेक्ट पण आहेतच…प्रेम नाथची ऐकटींग ज्याला आवडते त्याला कुणाचीही ऐकटींग आवडू शकते…)

 प्राणने जरी ह्या नटानबरोबर कामे केली असली तरी खरी मजा यायची ती अमिताभ बरोबर..”जंजीर” च्या साखळीने ही जी जोडी बांधल्या गेली ती थेट “तेरे मेरे सपने” करत थांबली..मजबूर मधला “मायकेल” असू दे की डॉन मधला “जे जे”….अमर अकबर मधला स्मगलर “किशन लाल” असू दे की शराबी मधील उद्योगपती बाप “अमरनाथ कपूर”…दोघांनीही एक-मेकांचा आब आणि कथेचा बाज ओळखूनच अदाकारी केली….

 जातीचा मटण खाणारा कसा मटण आणि वडेच चापणार तसेच ह्या जोडीचे होते…(हवे असेल तर वडे आणि भेंडीची बुळबुळीत भाजी खावून बघा….उदा. जितेंद्र आणि प्राण…सिनेमा…परिचय…केवळ इतर तोंडी मस्त लावणी होती म्हणून ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष्य झाले…कथा,संगीत,लहान मुलांची आणि खास करून जया भादुरी व संजीव कुमारची ऐकटींग ह्या पाच गोष्टीमुळे हे प्रकरण झाकल्या गेले…नाहीतर ह्या सिनेमाची अवस्था पण…वक्त की दिवार…ह्या जितेंद्र आणि प्राण ह्यांच्याच… सिनेमा सारखी झाली असती….खरे तर “वक्त” आणि “दिवार” हे दोन्ही मस्त सिनेमे….पण केवळ नावे एकत्र असली की सिनेमा चांगला होतोच असे नाही…..थोडक्यात काय तर माझ्या मते प्राण म्हणजे जेवणातल्या वडयानसारखा… )

दहावी नन्तर सिनेमा बघायचा चान्स मिळायला लागला आणि खा-खा केल्या सारखे खूप सिनेमे बघितले.आणि मग ऐकटींग म्हणजे फक्त मारामारी नसून इतरही काही असते हे पण थोडे-थोडे कळू  लागले..पूर्वी बघितलेले सिनेमे परत एकदा बघायला लागलो…आणि परिचय बघतांना एका कठोर बापाची एका प्रेमळ आजोबांकडे होणारी वाटचाल हा कथेचा एक पदर आणि प्राणच्या अभिनयाची उंची पण समजली…डोळे हे अभिनयाचे मुख्य अंग आहे…हे जंजीर मधील सावकाराला गहाण म्हणून “शेर खान के मुंछ का बाल” असे म्हणून सावकाराकडे टाकलेली नजर…खरे तर जंजीर मध्ये असे प्राणचे खूप प्रसंग आहेत…एक सुसाट बंदुकी आणि तोफगोळ्या सारखा डायलॉग आणि नजर….”कनीज की औलाद”…”चलती ट्रेन में सिगरेट पिना मना है”…”ये आप नही आपकी वर्दी बोल रही है”…जोक सांगून झाल्या नंतर पण संपूर्ण थेटरभर कुणीच न हसल्याने आणि मुख्यत: अमिताभ व जया न हसल्याने…म्हणजेच अजून अमिताभ मनाने मोकळा झाला नाही हे ओळखून आलेली अगतिकता फक्त डोळ्यांनी दाखवणे ही सोपी गोष्ट नाही….कट्ट्यावर हाच जोक ऐकल्यावर मनमुराद हसलो होतो….पण अजूनही हा जोक त्यावेळी हसवत नाही…

गुड्डी सिनेमा बघतांना “प्राण” म्हणजे वाईट मनुष्य अशी तिची समजूत का झाली ते समजत न्हवते…कारण माझा चित्रपट कालखंड जंजीर पासून सुरु झाला….पण मग प्राणचे जुने सिनेमे बघतांना तिने चुकीचा विचार केला नाही हे पटते….देव आनंद असो की दिलीप कुमार….शम्मी असो की राज कपूर…खलनायक एकच….आणि तो म्हणजे प्राण….त्यातही प्रत्येक वेळी लकब वेगळी..देह बोली वेगळी…भाषा वेगळी….पण नजर…तशीच दुष्ट आणि क्रूर आणि स्त्रीलंपट…

मी अजूनही कधी-कधी हिंदी सिनेमे बघतो पण ते बघतांना नकळत खलनायकाची “प्राण” बरोबर तुलना होते आणि मग मी परत डॉन, जंजीर, अमर अकबर किंवा तुमसा नही देखा बघून, १९८० साला नंतरचा हिंदी सिनेमा बघितला त्या पापाचे प्राय:चीत्य घेतो….

Advertisements

यावर आपले मत नोंदवा

Filed under Uncategorized

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s