खूप वर्षांपूर्वी मराठीत एक मालिका आली होती..”श्वेतांबरा” नाव होते तीच…हि बहुदा मराठीतील पहिली मालिका असेल…मी एक-दोन भाग बघितले असतील पण नंतर कंटाळा आला म्हणून नाही बघितले.”रामायण आणि महाभारत” फार पूर्वीच वाचून काढले असल्याने त्याही मालिका मी बघितल्या नाहीत…बाकी “हम लोग आणि तमस” पण नाही बघितल्या…”तारा” ही मालिका पण बघितली नाही…
पण..
एक दिवस असे वाटले की आपण ह्यामुळे मित्रांच्या संभाषणात भाग घेवू शकत नाही म्हणून निदान एक तरी मालिका बघू या म्हणून “आभाळमाया” ही मालिका बघायला सुरुवात केली…जवळ-जवळ मी त्या मालिकेचे ३०० भाग बघितले….आणि मग मनाशी एक हिशोब मांडला…
१. रोजचा वेळ ३०० X ३० मिनिटे = १५० तास….(ह्यात मी सुरुवातीची १५ आणि नंतरची १५ अशी ३० मिनिटे घेतली नाहीत…खरे तर मी टी.व्ही. मालिका बघायला १५ मिनिटे आधी सुरु करायचो आणि नंतर १५ मिनिटांनी तो बंद करायचो….
२. ह्या १५० तासात मी माझ्या कुटुंबियांशी एक शब्द पण बोलत न्हवतो….
३. ह्या मालिकेतील मला भावलेली ५० वाक्ये पण मी सांगू शकत न्हवतो….
४. ह्या कथेचे पुस्तक वाचायला मला जास्तीत जास्त १० तास लागले असते….त्यासाठी मी १४० तास फुकट घालवले……देवाने दिलेले ते तास मला इतर चांगल्या कारणासाठी पण वापरता आले असते….
सुदैवाने ह्या नन्तर “डिस्कवरी” आणि “National Geographic ” ह्या चानेल चा मला शोध लागला…आणि मग त्यावरचे “Building Big, Seconds from Disaster, Mega Structure, How they Do It, Air Crash Investigarion” हे कार्यक्रम बघतांना माझ्या कामात कधी सफाई आली ते कळले पण नाही..तेंव्हापासून मी मालिका बघत नाही….पण माहिती-पूर्ण कार्यक्रम जरूर बघतो…..
Thanks to Discovery & National Geographic….