बायको हे एक अजब रसायन आहे!!!

 
आपण कामावरून येतांना शाळेतला  मित्र खूप दिवसांनी भेटला आणि त्याच्याशी योग्य ठिकाणी बसून आणि शाळेतील हरवलेल्या व्यक्तीन विषयी  गप्पा मारतांना उशीर झाला तर हे कारण ती पटकन स्वीकारत नाही….कारण एक तर वास येवू नये म्हणून तोंडात असलेले पान आणि दुसरे फक्त आपलाच नवरा  सोमरस पितो हा अंध-विश्वास…… पण हीच गोष्ट तिच्या-बाबतीत झाली तर,,,,”अय्या आज काय गम्मत झाली माहित आहे का?ती नाही का माझी मैत्रीण…अमेरिकेला असते ती…(त्यावेळी चेहरा असा असतो…कि तुम्ही का नाही अमेरिकेला गेलात?)…तर तिना अचानकच रस्त्यात भेटली…म्हणजे काय झाले माहित आहे का? मी न्ना आज न्ना नेमकी ती ५:३२ ची अंबरनाथ न पकडता”….इ. इ. कहाणी सुरु होते….ही कहाणी किती वेळ चालेल ते सांगता येत नाही….त्या अमेरिकन मैत्रिणीमुळे.(बायकोच्या… आपल्या नाहीत … आपल्या अमेरिकन मैत्रिणी नन्तर भेटत नाहीत…हा आपला दोष नसून पत्रिकेचा असतो…हा कधीच काढता येत नाही…बायकोने मनापासून वट-सावित्रेचे व्रत केल्याने…..पुढचे सात जन्म भोगा आपल्या कर्माची फळे…ह्या बायका पण ना…हे व्रत वेळ नसेल तर वडाची डहाळी-फांदी-मूळ-पाने जे काही हाताला लागेल ते घेवून हे व्रत करतात….मी पण बायको-बरोबर ह्या पूजेला जावून येतो…बायकोला वाटते आपला नवरा काय प्रेमळ आहे….पण मी  मात्र त्याच  रात्री त्याच वडाला उलट्या फेर्या मारून येतो…बघुया आता हा उपाय लागू होतो का ते….तुमच्याकडे दुसरा कुठला उपाय असेल तर सांगा…अशी ना एकमेकात विचारांची देवाण-घेवाण हवी.)…तर सांगायचा मुद्दा काय तर..त्या अमेरिकन मैत्रिणीमुळे आपल्याला भारतीय फास्ट फूड म्हणजे खिचडी-कढी जेवायला मिळते….
 
एकदा हिची म्हणजे बायकोची…एक शाळेतील मैत्रीण रस्त्यात भेटली…बोलता बोलता हिची मैत्रीण म्हणाली…अग माझा नवरा न्ना खूप चांगला आहे पण सारखा सुपारी खात असतो…आता हिने गप्प बसावे कि नाही…पण नाही असा फुल-टोस बौल मिळाला तर सचिन ज्या त्वेषाने मारेल त्याच त्वेषाने हिने उत्तर दिले….अग माझ्या नवर्याला  सुपारीचे व्यसन नाही…ती मैत्रीण गेली आणि मी बायकोला म्हणालो  “अग धन्यवाद”…त्यावर बायको उत्तरली…अहो ती बावळट आहे…मी नंतरचा  “च” उच्चारालाच नाही….खरे तर मला पण म्हणता आले असते ….की…अग माझ्या नवर्याला  सुपारीचे(च)  व्यसन नाही….आता बघा दर रोज तुम्ही गाडीत इतर उभ्या असलेल्या  लोकांचा वेळ मजेत जावा म्हणून पत्ते खेळता…महाराष्ट्र राज्य श्रीमंत व्हावे म्हणून तिकिटे विकत घेता….तरी-पण तुमची समाजसेवा संपत नाही म्हणून तुम्ही १५ मिनिटे चालणार्या इतर राज्यांची पण तिकिटे विकत घेता….जोडीला तंबाखू पिकवणार्या शेतकर्यांचे भले व्हावे म्हणून त्यांचा माल रोज स्वत: वापरता…ओढून आणि गालात ठेवून….(ही गोष्ट मात्र खरी आहे…तंबाखूला योग्य भाव मिळावा म्हणून ते पिकवणारा शेतकरी आंदोलन का करत नाही?)…शनिवार-रविवार तुम्ही घोडे पैदाइस करणाऱ्या व्यापाराचे भले करायला पार दिल्ली-कलकत्ता-बंगरूळ पर्यंत जाता….आणि मग अजूनहि  समाज-सेवा करून  पोट भरले नाही म्हणून मुलींचा नाच बघायला  जाता आणि जाता-जाता तेवढेच पुण्य कर्म म्हणून कर्ज-बाजारी झालेल्या दारू-सम्राटाची त्याची दारू पिवून  मदत पण करता…आणि ही एवढी पुण्य-कर्मे करत असतांना तुम्हाला “सुपारीची” आठवण पण येत नाही….सांगा बरे मी काही खोटे बोलले का?
Advertisements

यावर आपले मत नोंदवा

Filed under Uncategorized

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s