Positive Chain Reaction….(मला ह्याचा मराठीत अनुवाद करता आला नाही…कुणीतरी सांगितले तर बरे…)

Positive Chain Reaction….(मला ह्याचा मराठीत अनुवाद करता आला नाही…कुणीतरी सांगितले तर बरे…)

मागच्या आठवड्यात एकजण बोलता बोलता मला म्हणाला…साहेब तुमच्या एवढा शांत साहेब मी दुसरा बघितला नाही…आणि…मन एकदम भूत-काळात गेले…माझे एक साहेब होते  “भागवत जनार्दन कोष्टी” म्हणून…मी पण त्यांना हेच वाक्य म्हणून त्यांच्याविषयी आदर भावना व्यक्त केली  होती…त्यावेळी त्यांनी सांगितलेली गोष्ट…..

एका कारखान्यातील एक व्यवस्थापक रोज  कामात चुका करायचा…आणि वरीष्ठांचा ओरडा खायचा…संध्याकाळी तो हा राग बायकोवर काढायचा…बायको तो राग मुलावर काढायची आणि मुलगा मग तो राग कुत्र्यावर दगड मारून  काढायचा…आणि कुत्रा तो राग त्या व्यवस्थापकाच्या स्कूटरवर मुतून व्यक्त करायचा,,,,रोज सकाळी व्यवस्थापक स्कूटर सुरु करायला जायचे तेंव्हा त्यांना कुत्र्याचे प्रताप कळायचे…मग काय आधीच वेळ कमी त्यात ही कुत्र्याने केलेली घाण….साहेब तसेच रागात कामावर जायचे आणि कामात चुका करायचे…..परत कहाणी सुरूच….अंतहीन….

ह्याला उपाय एकच….

व्यवस्थापकाच्या जागी आपण आहोत असे समजायचे….आणि कामाच्या ठिकाणाचा राग घरी घेवून जायचा नाही…..आता ही चेन इथेच थांबली…..साहेब,बायको,मुले आणि कुत्रा ह्यांचे चिडणे-रागावणे आपल्या हातात नाही पण आपल्या मनावर तर आपण नक्कीच ताबा मिळवू शकतो….आणि अजून एक…माझ्या हाताखालची माणसे ही मला मुलांसारखी आहेत असेच मला वाटते…तुम्ही चुका करणारच…..उलट त्यामुळे माझ्या ज्ञानात भरच पडते….मग मी तुम्हाला कशाला ओरडू?

मला वाटते की माझे सहकारी माझ्याविषयी असे बोलतात हीच माझ्याकडून त्यांना गुरु-दक्षिणा…..

Advertisements

यावर आपले मत नोंदवा

Filed under Uncategorized

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s