F173 आणि भट साहेब….आणि मितेश पटेल….(टीम वर्क)

 
माझे आणि दत्तागुरुंची अनेक गोष्टीत साम्य आहे…… ,कुत्रा , गाय आवडणे….त्यापैकीच  एक    गुण म्हणजे भरपूर गुरु…दत्तगुरुनी  २१ गुरु केले असे म्हणतात…(मला नक्की आकडा माहित नाही.चूक दुरुस्त केली तर उत्तम)..माझे पण भरपूर गुरु झाले….त्यापैकीच एक म्हणजे भट साहेब….
 
Project Comissioning सुरु असतांना एका रविवारी माझी दुसरी पाळी असतांना  टाटा-हनीवेल च्या डी.सी. एस. मध्ये एक सिस्टीम एरर आली…F173…त्यावेळी ही सिस्टीम आंम्हा सर्वांनाच नवीन होती…मी प्रयत्न केला…पण मला काही जमेना..मग भट साहेबांना बोलावून घेतले….त्यांनी पण प्रयत्न केला पण त्यांच्याकडून पण हि एरर निघेना…शेवटी ती Batch manually काढली…ती रात्र माझी खूप वाईट गेली….सोमवारी कामावर गेलो…थोडे (काय चांगलेच) दडपण होते..भटसाहेब म्हणाले आज-पासून तू रात्र-पाळीला ये…मग काय परत घरी गेलो….
 
रात्री आलो तर बरोबर मितेश पटेल नावाचा इंजिनियर होता…त्याने सेकंड शिफ्ट कडून चार्ज घेतला….मी अजून सुतकातच होतो…थोड्यावेळाने मला म्हणाला…..हे बघ मी अजून ७ दिवस तुझ्याबरोबर आहे आणि नंतर आम्ही कुणीच रात्र-पाळी करणार नाही कारण Comissioning ह्या १० दिवसात संपेल….आता हे सहा-सात दिवस तू झोपलास तरी मला चालेल..पण नंतर रात्री प्रोब्लेम आला तर तुलाच त्रास होईल…तू ठरव आणि सांग झोपणार कि काम करणार?  आणि त्या  दिवसा (खरे तर रात्री) नंतर सगळा चार्ज त्याने माझ्याकडे दिला….ही गोष्ट १९९३च्या जून मधली….नंतर फेब्रुवारी १९९८ला मी ती कंपनी सोडे पर्यंत तो प्लांट तर माझ्याकडे होताच पण त्या शिवाय अजून ९ प्लांट माझ्याकडे आले….१९९३  नंतर मी कधीच मागे वळून बघितले नाही….मितेश पटेल बरोबर घातलेली ती डी.सी.एस. ची ७ दिवसांची सप्तपदी  (माझे दुसरे लग्न)  मला अजून पुरत आहे…
 
आता ह्यात भट साहेबांचा रोल काय? अहो तेच तर मुख्य होते…माझ्याकडे तो प्लांट सोपवू नये हा जी.एम. चा निर्णय त्यांनी मान्य केला नाही…किंबहुना मी हे काम करू शकेन हा त्यांना विश्वास होता….माझ्यातील आत्मविश्वास त्यांनीच जागृत केला…
 
जाता जाता अजून एक गोष्ट…त्या प्लांट मध्ये मी पुढची २ वर्षे रात्र-पाळी केली आणि चार्ज घेवून १२ ते ७ मस्त झोप काढत होतो.एकदा तर त्याच जी.एम.ने मला झोपलेले पकडले…पण त्यावेळी असलेल्या शिफ्ट इन्चार्जने सागितले कि हा एकटा माणूस १० लोकांना भारी आहे….आम्ही कुणीच साक्ष देणार नाही….खरे तर मेंटेनन्स आणि प्रोडक्शन ह्यातून विस्तव जात नाही पण मला मात्र कामामुळे नेहमीच त्या कंपनीत चांगला सपोर्ट मिळाला…
Advertisements

यावर आपले मत नोंदवा

Filed under Uncategorized

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s