ऐका संसार देवाची कथा…..

एक आटपाट नगर होते…त्यात एक गरीब माणूस रहात होता..त्याचा संसार काही चांगला होत नसे…त्याची बायको इतर बायाकांसारखीच होती…त्यामुळे घरात रोज भांडणे असायची…एकदा तो असाच दुखी-कष्टी होवून बसला होता…सुदैवाने त्याची आणी आमची गाठ पडली…त्याने त्याची सर्व कहाणी मला सांगितली….मग मी त्याला संसार देवीची आराधना करायला सांगितली…त्याने ते व्रत केले आणि त्याचा संसार सुखाचा झाला…. सकाळी लवकर उठावे…आणि खालील गोष्टी रोज कराव्यात….

१. आजन्म बायकोची खोटी स्तुती करणे. (तू सुंदर दिसतेस,कामसू आहेस इ. ह्याला थापा म्हणत नाहीत असे बोलले तर पाप लागत नाही)

२. सासरच्या मंडळींची निंदा न करणे.(तुझा भाव्वू किती हुशार..तिसरी नापास १० वेळा झाला तरी…शिक्षक फालतू आहेत असे म्हणावे…सासरे किती बोल-घेवढे आहेत असे म्हणावे…भांडकुदळ असे स्पष्ट म्हणू नये…मेव्हणीची स्तुती करू नये….ती (म्हणजे मेहुणी) रंभा आणि बायको टूनटून असली तरी….मेहुणीकडे बघू नये…गप्पा तर अजिबात मारू नयेत..नाहीतर संशय-पिसाच्य मागे लागते…ह्या पिसाच्यावर उपाय नाही….

३. तिच्या स्वैपाकाला नावे न ठेवणे…(हॉटेल असतातच जवळ…नसेल तर हॉटेल जवळ जागा घ्या….पण मुले झाले की सोडा…मग मुले झाली की बायकांचा स्वैपाक सुधारतो..आता ही जादू कशी होते ते फक्त ब्रम्ह देवालाच माहित)

 ४. कचेरीतून रोज उशिरा घरी जा….थोडे दिवसांनी होईल सवय..

५. शक्यतो तो रोज एखादी बरी गजरेवाली बघून गजरा विकत घ्या…सगळ्यात स्वस्त आणि मस्त उपाय…साडीचा खर्च वाचतो…..

६. सुट्टीच्या दिवशी लवकर उठून चहा करून द्या…(बायको माहेरी गेली तरी बिघडत नाही…सवय राहते) आणि सर्वात महत्वाचे म्हणजे….

७. शांत रहा….(देव प्रत्येक वेळी हजर होऊ शकत नाही म्हणून त्याने आई व साहेब प्रत्येक वेळी हजर होऊ शकत नाही म्हणून त्याने “बायको” निर्माण केली आहे….. तर वत्सा असा हा साधा सरळ व सोप्पा बिन खर्चिक मार्ग आहे…जो कोणी हा वसा मुलाचे किंवा मुलीचे लग्न होई पर्यंत करेल त्याचे सदरे (म्हणजे मराठीत शर्ट)…सुखी माणसा सारखे होतील…..

आता मला दक्षिणा म्हणून एक एक कॉमेंट टाका…..

सदैव आपलाच जयंत फाटक……

Advertisements

4 प्रतिक्रिया

Filed under Uncategorized

4 responses to “ऐका संसार देवाची कथा…..

  1. Sachi

    khup chan ya sarv gosti pratek garat ghadlya tar pratek sansar sukhi honar

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s