Monthly Archives: फेब्रुवारी 2012

पहिली खरेदी….

 
लग्न झाले आणि आमचा संसार मांडायला म्हणून माझी आई  व माझी आजी
आमच्या बरोबर “मगोध-मंदिर” नावाच्या गावात आले..
६ डिसेंबर १९९२ ला लग्न झाले आणि बाबरी मशीद पण त्याच दिवशी पडली…
नंतर दंगल सुरु झाली म्हणून छोटी गाडी ठरवली…
सुट्टी जास्त न्हवती म्हणून १४  डिसेंबर ही माझी परत कामावर रुजू व्हायची तारीख होती..
गाडीत सामान काय…
१. ५ किलो कणिक
२. मसाल्याचा डबा.
३. पोळपाट आणि लाटणे….(लाटण्याचा  उपयोग नंतर मला मारायला म्हणून जास्त झाला)..
४. ४ ताटे , ४ वाट्या ४ भांडी आणि २ तांबे.
५. वातीचा स्टोव्ह…
६. एक तवा…
७. ३/४ पातेली
८. एक कढई……
 
मारुती व्ह्यान मध्ये सामान टाकले आणि आम्ही १२ ता.ला  सकाळी १० वाजता घर सोडले….ते संध्याकाळी ५ च्या सुमारास “मगोध-मंदिर”ला पोहोचलो…
२/३ दिवसांनी आई व आजी परत गेली आणि आमचा भातुकलीचा संसार सुरु झाला….बायको कानडी त्यामुळे रविवारी त्यांच्या प्रथेप्रमाणे “इडली”चा बेत ठरवला…
मिक्सर नसल्याने तिने पाट्या-वरवनट्यावर तांदूळ आणि डाळ वाटली…बायको काही बोलली नाही पण मिक्सर घ्यायला पाहिजे असे वाटले….
 
२/३ मित्रांकडे  चौकशी केली आणि मग एक दिवस मी आणि माझी बायको मिक्सर घ्यायला निघालो…
दोघांनी मिळून केलेली पहिली खरेदी ५ मिनिटात संपली….बजेट आणि गरज ह्यात जयपानचा मिक्सर फिट्ट बसला…
आपल्या आवडीवर बायकोची कॉमेंट नसते हे पाहून बरे वाटले….
आणि मग त्या खुशीत एक सिनेमा आणि बाहेर जेवण करून आम्ही परत मुक्कामी आलो…..
 
एव्हड्या पटकन खरेदी होते ते समजले पण अशा अजून किती खरेद्या बाकी आहेत ते काही कळत नाही….
Advertisements

4 प्रतिक्रिया

Filed under Uncategorized

माझी अर्धांगी…….

 
माझा प्रेम-विवाह झाला आहे…
लग्नाच्या आणा-भाका घेण्या-पूर्वी बायकोला स्पष्ट कल्पना दिली की…
मी प्रयत्न करीन की तुला रोज पंच-पक्वान्न खायला घालीन—पण—
कधी दुर्दैवी  वेळ आली तर ताक-भात खायची पण तयारी असेल तर आपण लग्न करुया”
बायकोने होकार दिला…
 
 लग्न झाले त्यावेळी (१९९२) माझी कुठलीच स्थिती चांगली न्हवती…
१. शिक्षण —डिप्लोमा इंजिनियर…
२. पगार जेमतेम २२००….(त्यात भाडे आणि स्कूटरचा हप्ता जावून हातात १७०० ते १७५० रुपये हातात यायचे)
३. घर भाड्याचे…ते पण पार खेडेगावात….गावातून जेमतेम ४/५ बसेस जायच्या….
 आणि रात्री ८ ते सकाळी ६ एक पण बस नाही…
४. दिवसातून २/३ लाईट नसायची….
५. भाषा वेगळी……
 
हा येव्हढा त्याग तर तिने केलाच पण शिवाय इतरही भरपूर मदत केली…..
 
१)आज तिच्या पाठीम्ब्यामुळे मी डिग्री पूर्ण केली…माझा परीक्षेचा फॉर्म पण तिनेच आणला
 आणि मी भरून दिल्यावर तिनेच पैसे पण भरले.
२)मला गल्फ मध्ये नौकरी करायची परवानगी पण दिली…
३)स्वत: जागा घ्यायला मला प्रोत्साहन पण दिले आणि त्याचे कागदोपत्री व्यवहार पण तीच बघत आहे..
४) आज ६/७ तास लोड शेडींग असते पण तिची लाईट वरची सगळी कामे लाईट जाण्या आधी पूर्ण असतात..
५) गुजराती भाषेवर तर तिचे प्रभुत्व आहेच पण त्या अनुभवामुळे ती जर्मन पण शिकली आणि इतर लोकांना पण शिकवते…..
 
थोडी तडजोड केली तर बर्याच गोष्टी साध्या होऊ शकतात…..
नौकरी करत असतांना आपण आपल्या सहकार्यांबरोबर आणि वरिष्ठ अधिकार्यांबरोबर काम करतो आणि पैसे मिळवतो…
मग आपल्याच जोडीदारा बरोबर संसार करतांना थोडी तडजोड केली तर घरात “सुख आणि समाधान” का नाही येवू शकणार?
 
 

2 प्रतिक्रिया

Filed under Uncategorized

द परफेक्ट स्टोर्म……

 
     एकदा एक सिनेमा बघून कट्ट्यावर गेलो…..मित्राने विचारले “कुठला सिनेमा बघितला”….मी म्हणालो “कबुतर का बदला“….तो म्हणाला ” हे काय सिनेमाचे नाव आहे का?”….मी म्हणालो “हो….त्याला तुम्ही “मैने प्यार किया” असे म्हणता”…..
 
   आम्ही चित्रपट शौकीन…आम्हाला कुणी एका वाक्यात जरी  कथानक सांगितले तरी चालते…कोलेजच्या नावाखाली टाइमपास करत असतांना केवळ पोस्टर बघून “वेट अंटिल डार्क” नावाचा अप्रतिम सिनेमा बघितला……
कुणीतरी कथानक सांगितल्यावर  आणि मग ते ऐकल्यावर सिनेमा पहायला जाण्यात काय मजा?…..
आणि “वेट अंटिल डार्क” सारखे सिनेमे जर कोण कथानक ऐकून बघत असतील तर त्यांना माझा सलाम….
“वेट अंटिल डार्क” चे सजेशन  फक्त एकाच वाक्यात होऊ शकते.
….आंधळ्या बाईने केलेले स्व-संरक्षण….कसे ते पडद्यावर बघा की…..
 
     अहो “तुफान” नावाचा अमिताभचा सिनेमा आला होता…त्यावर सर्व वर्तमान  पत्रांनी दणकून टीका केली तरीपण “अमिताभच्या” रसिकांनी तो पहायचा सोडले नाही….आणि वर्तमान  पत्रांनी  नावाजलेला “काकज  के फूल”चे पोस्टर बघायला पण कोण गेले नाही…….
थोडक्यात ज्याला सिनेमा बघायचा असेल तो कसाही बघेलच आणि ज्याला तो बघायचा नसेल तो तसाही बघणार नाही….
मग उगाच कथानक सांगण्यात आपला वेळ का वाया घालावा?….त्यामुळे मी फक्त मला आवडलेला सिनेमा सांगत आहे….
मला आवडला म्हणून तुम्हाला पण तो आवडलाच पाहिजे असा काही नियम नाही आहे आणि माझा तो आग्रह पण नाही आहे………कधीकधी चांगले सिनेमे नाव माहित नसल्याने बघितल्या जात नाहीत…….म्हणून लिहित आहे….. 
 
              मागील आठवड्यात काम करत असतांना पेन ड्राईव मध्ये व्हायरस शिरला…ट्रोझन हॉर्स…नावाचा….त्याला योग्य त्या रित्या नामशेष करून टाकले…..”ट्रोझन हॉर्स” वरून “ट्रोय” नावाचे काहीतरी वाचलेले आठवले म्हणून गुगलची मदत घेतली आणि मग “ट्रोय” डाऊनलोड करून बघितला…डिरेक्टर आवडला आणि मग  “द परफेक्ट स्टोर्म”  ह्या सिनेमाचा  शोध लागला…जरा चांगला असेल असे वाटले म्हणून त्याला पण कॉम्पूटरच्या हार्डडिस्क टाकून दिले….आणि बघितला….
 
लिंक देत आहे…कथानक वाचा आणि मग ठरवा….

यावर आपले मत नोंदवा

Filed under Uncategorized

सचिनने निवृत्ती घ्यावी का?

  सचिन तू निवृत्त हो असे आता बरेच जण सांगत आहेत…आणि मिडीया पण ह्या गोष्टीचे भांडवल करत आहे…पण का? ह्याचा कुणी विचार करत नाही….सचिनने काय करावे आणि काय करू नये असे सांगणारे हे कोण?…निवड समिती बघेल काय करायचे ते….सचिन हा शेवटचा मराठी खेळाडू…आता ह्या पुढे एक ही मराठी खेळाडू इतकी वर्षे भारतीय संघात नसेल…पार्थिव पटेलला जेवढी संधी दिल्यागेली तेवढी संधी “समीर दिघे” ह्या खेळाडूला का दिली नाही?…..समीर दिघेने पाकिस्तानी खेळाडूंचा १९९२ वर्ल्ड कपचा नशा एकाच म्याच  मध्ये उतरवला….आणि तो पण इंग्लंड मध्ये….तरी पण त्याला संधी दिल्या गेली नाही…..
 
 आज  लोकांच्या मते सचिन खेळत नाही…… मग कोण-कोण खेळत आहेत ते तरी सांगा……त्याला वगळले तर मग बाकीचे जिंकतील असे काही समीकरण आहे का?….सचिनचे एकच चुकले, की त्याने लोकांच्या अपेक्षा वाढवून ठेवल्या….सचिन=रन्स……आज त्याच्या मागे उभे राहायचे सोडून त्याच्यावर दडपण आणून त्याला खेळायला द्यायचे नाही असेच धोरण दिसत आहे…आज सर्व मिडीया इतर बिगर-मराठी लोकांच्या हातात असल्याने….जमेल तसे आणि जमेल त्या मार्गाने मराठी लोकांचा अपमान करण्याचाच मिडीयाचा प्रयत्न आहे….इथे उगाच इतर देशांचा दाखला देवू नका…..ते लोक तेंव्हाच काढतात जेंव्हा ती गोष्ट फक्त त्या व्यक्ती पुरतीच असते….म्हणजे इतर टीम-मेंबर खेळत आहेत आणि तो एकटाच खेळत नसेल तर…..
 
      गांगुलीला खेळायला मिळावे म्हणून आधी अतुल बेदाडे आणि नंतर विनोद कांबळी ह्यांचा काटा काढण्यात आला….अमोल मुझुमदारला तर संधी पण दिली नाही….
 
बेदी साठी ….पद्माकर शिवलकरचा बळी गेला…..
प्रवीण आमरेला “विरू” एवढी पण संधी दिल्या गेली नाही….
दिलीप वेंगसरकरचा काटा तो पाकिस्तान मध्ये खेळायला गेला नाही हे कारण पुढे करून काढला…आणि तसेही आपण तिथे हरणारच होतो आणि हरलोही आणि मग त्यावेळी “श्रीकांत” हा कप्तान असल्याने त्याचा पण काटा काढला……
 
आता जर सचिनची पाळी आणली तर मग भारतीय क्रिकेटला कधीच चांगले दिवस येणार नाहीत…..कारण नक्की हे काय झालेले आहे हे खेळाडूंना तर माहित असणारच…आणि मग त्यामुळे आतील राज-कारणाला अजूनच खत-पाणी मिळेल……त्यामुळे सचिनने निवृत्ती घ्यावी का? हा प्रश्न सचिनला सोडवू द्या…….
 
 

यावर आपले मत नोंदवा

Filed under Uncategorized

मी आणि अर्थसंकल्प……

 
दर वर्षी अर्थ संकल्पात ह्या गोष्टी असतातच…
१. सिगरेटची आणि दारूची भाववाढ…
२. प्रवास महाग…
३. महाराष्ट्रातील रेल्वे मार्गांना परवानगी न देणे..(किंवा नवीन गाड्या सुरु न करणे)
४. इलेक्ट्रोनिक वस्तूंच्या किमती कमी करणे…
५. इन्कम ट्याक्स ची मर्यादा वाढवणे….

यावर आपले मत नोंदवा

Filed under Uncategorized

चंगू-मंगू आणि ममी

 
चंगू-मंगू   इजिप्त मध्ये पिर्यामिड बघायला जातात.तिथे एक ममी असते.
तिला बघून चंगू- म्हणतो…..अरे ह्याला बघ किती पट्या बांधल्या आहेत..
मंगू ….हो ना बहुतेक अपघात झालेला दिसत आहे…ट्रकने उडवल आहे बहुतेक…..
चंगू-…बघ आणि ट्रकचा नंबर पण लिहिला आहे….A.D.1470….

यावर आपले मत नोंदवा

Filed under Uncategorized

भारताची प्रगती—उन्नती की अनुकरण प्रीयता…..(शून्यापासून शून्याकडे)…..

 
आज एक मस्त लेख वाचनात आला. “भारताची प्रगती” ह्या विषयावर.खरेच प्राचीन भारताने तंत्रज्ञान ह्या विषयात खूप मौलिक भर टाकली होती..”शून्य ह्या संकल्पनेचा शोध असो की आकाशातील ग्रह असो..आयु:विज्ञान असो की अणू-रेणू चा शोध असो..त्यावेळी भारत आणि चीन हे देश आघाडीवर होते.कारण देशातील राज्यकर्ते स्थिर होते आणि परकीय आक्रमण झाले न्हवते.आपापसात युद्धे होत असत पण कोणी मंदिरे अथवा वाचनालये ह्यांचा नाश करत न्हवते.सूर्य स्थिर आहे आणि पृथ्वी व इतर ग्रह तिच्या-भोवती फिरत आहेत असा शोध लावला म्हणून त्या भारतीय शास्त्रज्ञाला कुठल्याही राजाने देहदंड दिला नाही..ते त्यांच्या जागी आणि राजा व प्रजा आपल्या जागी..नालंदा व तक्षशिला ह्या विद्यापीठांचा आणि राज्यकर्ते ह्यांचा संबंध फक्त दान घेणे व दान देणे ह्यापुर्ताच मर्यादित होता..
 
पण जेंव्हा परकीय आक्रमण आले त्यावेळी त्या परकीय लोकांनी सर्वप्रथम वाचनालय आणि नंतर मंदिरे ह्यांचा नाश केला..शिक्षक आणि विद्यार्थी ह्यांचा पण नाश केला..शिक्षण घेतांना पुस्तक आणि शिक्षक आवश्यक घटक असतात.आणि त्याच वेळी भक्कम सामाजिक,आर्थिक आणि राजकीय पाठींबा लागतो.भुकेला मनुष्य आधी पोटाची खळगी भरायचा प्रयत्न करेल आणि मगच बुद्धीची तहान भागवायचा प्रयत्न करेल.पण त्यासुमारास सगळीच अनागोंदी होती ती थेट १९४७ पर्यंत चालूच होती.
 
इंग्रच लोकांनी एकच चांगले काम केले आणि ते म्हणजे त्यांनी त्यांची भाषा आपल्याला शिकवली.पण बाकी प्रत्येक ठिकाणी त्यांनी भारतात जुने तंत्रज्ञान दिले.स्वतंत्र झाल्यावर पण त्यांनी आपल्याला दोन शत्रू दिले.एक अंतर्गत आणि दुसरा शेजारी.मी आधीच व्यक्त केलेले मुद्दे आता थोडे विस्तारपूर्वक लिहितो…
 
भक्कम सामाजिक,आर्थिक आणि राजकीय पाठींबा….
 
सामाजिक पाठींबा…
 
समाजाची उन्नती ३ ठिकाणी होते….वैचारिक,आर्थिक आणि तंत्रज्ञान….आजही आपल्याला वैचारिक स्वातंत्र्य आलेले नाही…जे काही वर्तमान पत्रात आणि टी. व्ही. वर दाखवतात तेच सत्य असे समजणारी ६० ते ७० % प्रजा ह्या देशात आहे.एक उदाहरण देतो…शरद पवारांनी जशी थोबाडीत खाल्ली तशीच थोबाडीत अजून कुणी-कुणी खाल्ली असे कुठल्याही वर्तमान पत्रात आणि टी. व्ही. वर आले नाही…त्याच घटनेवेळी ह्याच जनतेची काय प्रतिक्रिया होती ते स्वत:हून जाणून घ्यायचा कुणी प्रयत्न पण केला नाही…म्हणजे आज लोकांनी काय बघावे आणि काय वाचावे आणि काय प्रतिक्रिया द्यावी हे कोणीतरी भलतेच ठरवत आहे…म्हणजेच आज तरी भारतात वैचारिक स्वातंत्र्य नाही…माझा मुलगा अथवा मुलगी संशोधन करत आहे आणि आमचा त्यांना पाठींबा आहे असे किती पालक सांगू शकतील..माझ्या क्षेत्रात आजही ९०% वस्तू भारतात तयार होत नाहीत किंवा त्यांचे संशोधन पण होत नाही…त्या फक्त असेम्बल केल्या जातात..
 
आर्थिक पाठींबा…
अन्न , वस्त्र आणि निवारा ह्या नेहमीच प्राथमिक गरजा असतात…आणि जोडीला वीज व दळण-वळण ह्या पण पूरक गोष्टी लागतात..मी सध्या भारतात रहात नाही आणि त्यामुळे  एक गोष्ट
माझ्या लक्षात आली की माझे इथे कामात मन रमते कारण रोजच्या आयुष्यात मला माझी  अनावश्यक शक्ती वाया घालवायला लागत नाही.वीज,पाणी आणि वाहतूक सुरळीत असते.मला माझ्या वेळेप्रमाणे कपडे धुणे,भांडी घासणे,स्वैपाक करणे इ. गोष्टी करता येतात.त्यामुळे माझ्या वेळेचा उपयोग मला कसा करायचा ते ठरवता येते.उगाच वीज आणि पाण्याची वाट बघण्यात वेळ वाया जात नाही..भारतीय मनुष्य पैसे कमावतो ते ३ व्यक्तींसाठी…१) शिक्षण-सम्राट..२)गृह सम्राट आणि उरलेले ३)आरोग्य सम्राट…..ह्यापैकी ३रा सर्वात घातक…कारण सध्या जरी त्यात परदेशी गुंतवणूक कमी असली तरी ती उत्तरोत्तर वाढत जाणार आहे…आणि त्यावेळी आपले स्वत:चे असे पैसेही फार कमी उरलेले असतात..आजही कुठलीही व्यक्ती आपल्या मुलांकडून आरोग्यासाठी पैसे मागत नाही..ज्या व्यक्तीने गेली २५-३० वर्षे इमाने-इतबारे कर दिला आहे तिला निदान आरोग्य-सेवा तरी फुकट असावी असे कुठल्याच नेत्याला वाटत नाही आणि तो आपला अधिकार आहे असे जनतेला पण वाटत नाही…कारण ह्या गोष्टींची चर्चा टी. व्ही. वर येत नाही…ह्याविषयी काही कायदे करावेत असे वर्तमान पत्रे पण लिहित नाहीत…
 
राजकीय पाठींबा….
इतर दोन्ही पाठींबे ह्याच्या शिवाय येणार नाहीत..आज कितीतरी विद्या-पीठे आणि शिक्षण संस्था सरकारी पैशांवर चालतात.गोष्ट चांगली आहे.पण मग अशा उत्तम संस्थेतील विद्यार्थी भारतीय जनतेने दिलेल्या पैशांवर शिक्षण पूर्ण करून परदेशी जातात.तिथेच स्थाईक होतात.ह्यामागे नक्की काय कारण आहे ह्याचा शोध का घेतला जात नाही आणि हीच मंडळी परत आपल्या देशात यावी म्हणून काय योजना करावी असे सरकार का ठरवत नाही?आज कुणीही दत्ताजी शिंदे किंवा फिरंगोजी न होता सूर्याजी पिसाळ ह्यांचाच आदर्श का ठेवत आहेत?चूक ते भारत सोडून गेले ही नसून भारतीय सरकार सामान्य माणसाला सुखा-सुखी जगू देत नाही हि आहे..असो घरचे जर जेवण देत नसतील तरच आपण घर सोडतो..घरी जेवण मिळाले तर कोण बाहेर जाईल?
 
जो पर्यंत राजकीय पाठींबा नसेल तोपर्यंत सामान्य माणूस आर्थिक विवंचनेतच गुंतून राहील आणि त्यामुळे सामाजिक स्थैर्य पण येणार नाही….अशीच स्थिती राहिली तर ज्या भारताने शून्याचा शोध लावला तोच भारत स्वत: एक मोठा शून्य व्हायला वेळ लागणार नाही

यावर आपले मत नोंदवा

Filed under Uncategorized