मला भारतीय संघ आवडतो….

कारण,

१. तो ४ दिवसात सामना संपवतो…त्यामुळे होणारे फायदे….

   अ) सामने निकाली होण्याचे प्रमाण वाढते.

    ब) १ दिवस सामना लवकर संपल्याने विजेची आणि वेळेची बचत.

    क) खो-खो आणि क्रिकेट मधला फरक आणि साम्य ह्या गहन विषयावर चर्चा करायला प्रोत्साहन देतो.

२. बाकी सगळे संघ १ दाच फलंदाजी करतात , हा मात्र २ वेळा.

३. खेळतो ४ दिवस पण पैसे मात्र ५ दिवसांचे…..हे म्हणजे पगारदार नोकरांसारखे…आजारी पडलो तरी पगार चालू…त्यामुळे नोकर-दार माणसांना आपण कधी-कधी फुकट पगार घेतो ही वाईट भावना नष्ट करतो…

४. “मरावे परी कीर्ती रुपी उरावे” ही म्हण नाहीशी करून….”एक शतक ठोकावे आणि १० सामने खेळावे” ही नवी म्हण जनात आणि मनात रुजवायला मदत करतो…

५. निवृतीची अट वयावर अवलंबून नसून, संबंधांवर अवलंबून असते, हे सिद्ध करतो…(जरा अवती भोवती पहा)

६. जीवन ४० व्या वर्षी सुरु होते असे एक वाचन आहे….खोटे वाटत असेल तर ह्या खेळाडूंकडे पहा…..

 

यावर आपले मत नोंदवा

Filed under Uncategorized

यावर आपले मत नोंदवा