मनोहर आठवले (दहा लाखातील एक नाही दहा लाखात एक)

मनोहर आठवले (दहा लाखातील एक नाही दहा लाखात एक)

मनोहर आठवले, हे नाव कसे साधे सरळ वाटते की नाही.मग मी माझ्या व्यक्तिचित्रात ह्याच व्यक्तीची प्रथम निवड का केली?
एक चीनी म्हण आहे, जर तुमच्याकडे २ रु. असतील तर १ रु. ची भाकरी घ्या आणि १ र. चे गुलाबाचे फूल घ्या….भाकरी मुळे तुम्ही जगाल, तर गुलाबाचे फूल , तुम्हाला कसे जगावे आणि का जगावे ते सांगेल. असेच भरपूर गुलाब असलेला हा एक साधा सरळ,पापभीरू आणि १०० टक्के निर्व्यसनी माणूस.आज काल निर्व्यसनी माणूस सापडणे हे हिंदी सिनेमात मराठी डायलॉग सापडण्याएवढे कठीण आहे.माझ्या लहानपणी ही अशीच माणसे घरो-घरी होती.

१९७४ मध्ये आमच्या कडे दूरदर्शन आला.आमच्या संपूर्ण सोसायटीतील ३६ कुटुंबांमध्ये फक्त २ जणांकडे हे यंत्र होते.त्यामुळे दर शनिवारी घराला नाट्य-गृहाचे व रविवारी सिनेमा-गृहाचे स्वरूप येत असे.बाद-रायण संबध जोडून ही खूप माणसे येत. कार्यक्रम बघत व निघून जात.असेच एक दिवस हे मनोहर आठवले सह-कुटुंब आले.इतर मंडळी जशी वागत होती तसे न वागता आठवले काकूंनी माझ्या आईला चहा व नाश्ता बनवण्या पासून ते शेवटची आवरा-आवर करे पर्यंत सगळी मदत केली.त्या माझ्या आईला वहिनी म्हणत , त्यांची छोटी मुलगी पण माझ्या आईला वहिनी म्हणायला लागली.

रीती-भाती प्रमाणे आमचा निरोप घेता घेता त्यांच्याकडे यायचे आमंत्रण केले.

आईला पण हे कुटुंब आवडले आणि एक दिवस आम्ही त्यांच्याकडे गेलो.त्यावेळी कोणाकडे पण असेच न कळवता जायची पद्धत होती. आठवले काका एकदम मध्यम वर्गीय लोकांच्या पोषाखात होते.चट्टेरी-पट्टेरी लेंगा आणि गळ्यात जानवे. आठवले काका आणि त्यांच्या कुटुंबीयांनी आमचे मनापासून स्वागत केले.त्यानी वडिलांच्या तर त्यांच्या मुलांनी आमच्या कानाचा ताबा घेतला.हळूहळू आमचे आणी त्यांचे संबंध अधिकाधिक घट्ट होत गेले.एक दिवस असेच गप्पा मारत असतांना stamps चा विषय निघाला.त्यांनी मग त्यांच्या कडील stamps चा खजिना दाखवला.आठवले काकांना छंद कुठला तर भारतीय सरकारने प्रकाशित केलेले stamps पहिल्या दिवशी घेणे.ते एक पाकिटात येतात.philadeli असे नाव आहे.

सतत हसतमुख आणि सदैव चांगल्या माणसांच्या शोधात असलेली ही मंडळी सध्या बदलापूरला असतात.निवृत्तीनंतर त्यांचे आणि संबंध फार कमी झाले.कामामुळे ते अधिकच दुरावले.कधी कधी जुनी पत्रे वाचतांना भारतीय stamp चे दर्शन होते आणि त्याच बरोबर आठवले काका आणि मंडळी पण आठवतात.

सुखी-चौकोनी कुटुंब म्हणजे तरी नक्की काय हो……साधे सरळ आयुष्य आणि निर्मळ मन…

Advertisements

यावर आपले मत नोंदवा

Filed under Uncategorized

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s