माझा निबंध…..

माझा निबंध…..

एकदा वर्गात ऑफ पिरिअड होता.
मस्त पुस्तक वाचत होतो….मार्क ट्वेन चे….टोम सायर….बाईनी निबंध दिला….

“मला पंख असते तर”

कोण मुंबईला गेला…..कोण हिमालयात गेला…(एक तर पार अमेरिकेत गेला….त्यावेळी अमेरिका दूर होती आणि इंग्लंड जवळ होते..)…तर कोण पक्ष्यान बरोबर गप्पा मारत बसला….

आता पुस्तक वाचावे की, निबंध लिहावा….मग काय पटकन निबंध लिहिला आणि पुस्तक वाचायला लागलो…..

बाईनी बघितले कि हे काय…हा मुलगा लिहित का नाही? त्यानी निबंध वाचला आणि सर्व वर्गाला “शंकराचे तांडव नृत्य, महिषासूर मर्दिनीचा त्वेष आणि त्रातीकेचे वाक्तांडव” एकाच वेळी दाखवले..तरी पण राग शांत होईना…मग मला झाशीच्या राणी प्रमाणे (पाठीला न बांधता) खेचत मुख्य शिक्षकान कडे नेले….त्यांनी पण “आग्या वेताळ, गब्बर सिंग, रावण,दुर्योधन, दुशासन” करून दाखवले…..शेवटी शकुनी मामा झाले आणि औरंगझेबा प्रमाणे फर्मान सोडले…..जा आणि बाबाना घेवून ये…..

मग काय बाबा आले….त्यांनी पण येण्या पूर्वी “जमदग्नीचा रोल केला” केला….आई तर तिचे माझ्या मनातील “वात्सल्य सिंधू” ह्या प्रतिमेला जोरदार धक्का दिला….भावाने मराठी भाऊ पण दाखवले…(म्हणजे आगीत तेल ओतले) आणि “विश्वास आणि भाऊ” पानिपतात मेले हे सिद्ध केले…..

मग बाबा आणि शिक्षक ह्यात तह झाला,,,,कलमे खाली देत आहे…
१. माझी पुस्तक वाचन बंदी.
२. रोज ४ पाने लिहिणे……

त्याचा सूड मी अजून उगवत आहे……आणि निबंध पण खरा करून दाखवला……

१. रोज मनसोक्त वाचन आणि
२. कमीत कमी लिहिणे……

ज्या गोष्टी मुळे हे सर्व झाले , तो निबंध वाचायचा आहे?

” मला पंख असते तर मी सगळे जग फुकट बघीन.”

आणि खर सांगायचे तर आज मी सर्व जग माझ्या कंपनी मुळे फुकट बघत आहे…..

Advertisements

यावर आपले मत नोंदवा

Filed under Uncategorized

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s