Monthly Archives: जानेवारी 2012

जयंत उवाच….पुरुषांची सप्तपदी……

 १. आजन्म बायकोची खोटी स्तुती करणे. २. सासरच्या मंडळींची निंदा न करणे. ३. तिच्या स्वैपाकाला नावे न ठेवणे…(हॉटेल असतातच जवळ…नसेल तर हॉटेल जवळ जागा घ्या….पण मुले झाले की सोडा)…. ४. कचेरीतून रोज उशिरा घरी जा….थोडे दिवसांनी होईल सवय.. ५. शक्यतो तो रोज एखादी बरी गजरेवाली बघून गजरा विकत घ्या… ६. सुट्टीच्या दिवशी लवकर उठून चहा करून द्या…(बायको माहेरी गेली तरी बिघडत नाही…सवय राहते)… ७. शांत रहा….

Advertisements

यावर आपले मत नोंदवा

Filed under Uncategorized

जयंत उवाच….गजरा….

ज्या पुरुषाने हा शोध लावला असेल त्याचा मी ऋणी आहे….(हा शोध नक्कीच पुरुषाचा आहे)….कारण…. बायकोचा राग (ह्या बायकांना रागवायला कुठलही कारण पुरते…उशिरा घरी जाणे, कामवालीशी बोलणे, मुलांना न ओरडणे, पालक सभेला न जाणे, असंख्य कारणे आहेत हो…) शांत करायचा हा प्रथम आणि स्वस्त मार्ग…….आणि परत तो चार चौघात, राज-रोस पणे करता येतो…अगदी सासर्यान समोर….

यावर आपले मत नोंदवा

Filed under Uncategorized

जयंत उवाच….”वर्तमान पत्र”

लग्न झाले तर लगेच “वर्तमान पत्र” चालू करा… ……. “वर्तमान पत्र” वाचतांना बायको कितीही बोम्बलली तरी काना पर्यंत पोचत नाही…

यावर आपले मत नोंदवा

Filed under Uncategorized

“क्लायंट”

जॉन ग्रीशामची आणि माझी गाठ तशी अचानकच पडली….वाचनालयात पुस्तक चाळतांना “क्लायंट” दिसले……जरा बरे वाटले…..

आणि काय सांगू ह्या माणसावर प्रेमच जडले हो……काल ह्याच कादंबरीवर आधारित सिनेमा पण बघितला…..पण कादंबरी सारखी मजा नाही आली….

यावर आपले मत नोंदवा

Filed under Uncategorized

सोर्स कोड……

 फूल टू सिनेमा…… दीड तासाचा सुन्न करणारा अनुभव……

यावर आपले मत नोंदवा

Filed under Uncategorized

साठी बुद्धी नाठी….

म्हणजे काय तर…..

(आहे) बुद्धी न आठी (कपाळावर)……

 
म्हणजेच…..असा माणूस की ज्याच्याकडे अनुभवाने व ज्ञानाने आलेले शहाणपण आहे आणि तो कपाळावर एकही आठी न आणता दुसर्यांचे म्हणणे ऐकून घेतो आणि त्यांना मार्गदर्शन करतो……
 
पण….
 
आपल्याला समाजात… (नाही) बुद्धी आणि आहे (कपाळावर) आठी ….अशीच मंडळी जास्त दिसतात…..

यावर आपले मत नोंदवा

Filed under Uncategorized

महात्मा गांधी जयंती,

 
 
एक अतिशय सामान्य माणूस आणि त्याचा राष्ट्र-पिता पदा पर्यंत प्रवास….स्वतंत्र होण्यासाठी अतिशय योग्य नेता…पण राज्य चालवायला नरम असून चालत नाही…वेळ प्रसंगी कठोर व्हावेच लागते…मुलगा चुकला तर त्याला तुम्ही क्षमा केली नाहीत पण एक जमाव गुंडगिरी करत असतांना त्यांना लाठी का नाही दाखवलीत?….
 
माझ्या मता प्रमाणे ह्या व्यक्ती कडून बरेच गुण घेण्या सारखे आहेत….
 
१. खरे बोला.
२. स्वदेशी वस्तू वापरा.
३. देशा साठी घराचा त्याग करा….
 
पण त्याच बरोबर ह्यांचे पण पाय मातीचे आहेत हे पण विसरू शकत नाही….
 
१. खरे बोला ….पण शत्रू समोर खरे बोलून कसे चालेल….
२. स्वदेशी वस्तू वापरा…..मग दर्जा पण निदान ९०% पर्यंत तरी आंतर-राष्ट्रीय पातळीवर ठेवा….
३. देशा साठी घराचा त्याग करा….हो तुम्ही आणि तुमच्या सहायकांनी जरूर केला..(लाल बहाद्दूर शास्त्री, सरदार पटेल इ.)…पण ज्यांना तुम्ही पंत प्रधान केले त्यांचे काय?..
 
घरात गांधी जरूर रहा…..पण बाहेर तुम्हाला “नथ्थूच” व्हावे लागते……नाठाळाला तीच भाषा समजते…
 
 

यावर आपले मत नोंदवा

Filed under Uncategorized